वंध्यत्व चिकित्सक

डॉ. रवींद्र एस चौधरी ( आयुर्वेदाचार्य )

Dr. Ravindra S. Chaudhari. (B.A.M.S.) डॉ.रवींद्र चौधरी यांचा जन्म १९५७ साली प्रताप हॉस्पिटल,अमळनेर, जि. जळगाव येथे झाला. त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण प्रताप हायस्कूल व त्यापुढील शिक्षण प्रताप कॉलेज, अमळनेर येथे झाले.

त्यानंतर वैद्यकीय शिक्षण  राधाकिसन तोष्णीवाल आयुर्वेद महाविद्यालय, अकोला येथे १९८४ साली पूर्ण करून बीएएमएस (आयुर्वेदाचार्य ) ही पदवी संपादन केली.  त्यानंतर त्यांनी त्यांचे मोठे बंधू डॉ. वसंत चौधरी, एम.डी. भुसावळ, जि. जळगाव  यांच्या रुग्णालयात  सहा महिने राहून वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण घेतले व अनुभव संपादन केला व लगेच १९८४ च्या शेवटी अमळनेर व जवळ असलेल्या मंगळूर या गावी स्वतःचा दवाखाना टाकून जनरल प्रक्टिस  सुरु केली.

ज्यांना मुलं बाळं होत नाही असे पेशंट पाहिल्यावर त्यांना त्यांच्या बद्दल हळ हळ वाटायची तसेच त्यांची दया यायची. त्यांना पहिल्या पासूनच वंध्यत्व या विषयाबद्दल कुतूहल, जिज्ञासा व आवड होती . त्यामुळे ते या विषयावरची मिळेल ती  पुस्तके , मासिके वाचु  लागले व त्यावरची औषधे देखील रुग्णांना देऊ लागले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की ज्यांना औषधे दिली त्या रुग्णांना त्याचा फायदा होतो आहे व त्यामुळे त्यांना त्यात अधिकच रस वाटू लागल्याने त्यांनी त्या विषयात संशोधन सुरु केले व २००४ साली  वंध्यत्व सल्ला व उपचार केंद्र , अमळनेर येथे सुरु केले. आतापर्यंत पाहता पाहता  ११७६ जोडप्यांना याचा फायदा होऊन त्यांना मुले झाली आहेत.

या कामात त्यांची पत्नी डॉ. सौ. अरुणा यांनी डॉक्टरांना नेहमीच मोलाची साथ देत आहेत. औषधे मागविणे, तयार करणे, त्यांचे पेकिंग करणे, पेशंट तपासणे, ह्या सर्व कामांमध्ये त्यांच्या बरोबरच त्यांची मुलगी डॉ. रश्मी व डॉ. आकाश चौधरी यांचीही मदत होत असते. त्यांच्या मते हे सर्व यश, आई वडिलांचे आशीर्वाद व देवाची कृपा या मुळेच लाभले.

डॉक्टर म्हणतात " वंध्यत्व चिकित्सा या विषयात मला फार समाधान, आनंद मिळतो, तसेच कीर्ती लाभते. पेशंटही आनंदी होऊन जातात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून धन्य झाल्यासारखे वाटते. बाळ झाल्यावर ते परत बाळा सहित भेटायला येतात, पाया पडतात, तेव्हा मन गहिवरून जाते. माझी देवाजवळ नेहमी एकच प्रार्थना असते - की  जे कोणी पेशंट माझ्याकडे उपचारा साठी येतील त्यांना मुलं बाळ होऊ दे, त्यांना आनंदी ठेव , व तशी शक्ती व बुद्धी देव मला देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. "